Nitin Gadkari News : शेतकरी (Farmers) हा इंधन दाता झाला पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. नेते येतात फोकनाड्या मारतात आणि निघून जातात. पण मी त्यापैकी नाही असे गडकरी म्हणाले. वर्ध्यातील सेलू येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे उपस्थित होते. शेतीत एआय तंत्रज्ञानाचा उपयोगाशिवाय संकटावर मात करता येणार नाही असे गडकरी म्हणाले.
वर्ध्याच्या सेलू येथे मानस ऍग्रो कंपनीकडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला. आपल्या गावात शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने आपण शेतकऱ्यांची जमीन बटाईने करीत असल्याचे सांगितले. गडकरी यांनी शेतकरी हा इंधन दाता झाला पाहिजे असे म्हणाले.
माझा ड्रोन आला, माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. मी माझ्या गावाच्या दोन दोन तीन तीन एकराच्या शेतकऱ्यांची जमीन बटाईने घेतल्याचे गडकरी म्हणाले. त्यांच्याकडे पैसेच नाहीत. बियाणे नाहीत. खतं नाहीत. श्रीहरी बापू महाराज धापेवाड्याचे आहे. त्यांची पस्तीस एकर जमीन मी बटाईने घेतली आहे. माझ्याकडील इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने पस्तीस एकर जमीन वखरणी झाली, खर्च शून्य लागला. ड्रोनने स्प्रेइंग सुरू आहे. ड्रोन देखील इलेक्ट्रीकवर आहे. म्हणजे येणाऱ्या काळात कलमापासून, बिजापासून, तर स्प्रेइंग पर्यत आपल्याला एआय तंत्रज्ञानांचा उपयोग केल्याशिवाय आपण संकटावर मात करू शकत नाही असे गडकरी म्हणाले.
मी जेव्हा मक्यापासून इथेनॉल करण्याचा विषय मांडला तेव्हा खुप लोकांनी विरोध केला
सरकारची धोरण महत्वाची आहेत. मी जेव्हा मक्यापासून इथेनॉल करण्याचा विषय मांडला तेव्हा खुप लोकांनी विरोध केला. पेट्रोलियमुळे 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात. तो इम्पोर्ट बंद करण्याच्यासाठी आम्ही संघर्ष करतो. पेट्रोलियम लॉबी माझ्याही मागे लागली. मी इथेनॉल तयार करीत नाही असा खोटा प्रचार केला. पण मी कधी डळमळलो नाही. आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर इंधन दाता झाला पाहिजे असे गडकरी म्हणाले. शेतकरी इंधन दाता नाही तर ऊर्जा दाता झाला पाहिजे, ऊर्जा दाता नाही तर डांबर दाता झाला पाहिजे, डांबर दाता नाही तर हायड्रोजन दाता झाला पाहिजे, हायड्रोजन दाता नाही तर हवाई इंधन तयार करणारा झाला पाहिजे असे गडकरी म्हणाले.