Amit Shah Maharashtra अकोला :  गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)) पार्श्वभूमीवर शाहा राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेणार आहे. दरम्यान, अमित शाहा आपल्या या दौऱ्यात अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. मात्र, अमित शहांच्या या दौऱ्याला आता विरोधाची किनार लागल्याचे देखील बघायला मिळत आहे. आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha Protestors)अमित शाह यांची स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्याची घटना ताजी असतांना आता अकोला येथे देखील अशाच प्रकारे बॅनर फाडल्याची माहिती समोर आली आहे.  


अज्ञातांनी फाडले अमित शहांच्या स्वागताचे बॅनर 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या नियोजित महाराष्ट्रात दौऱ्याच्या निमित्याने उद्या 5 मार्च रोजी अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला हजर राहणार आहे. यात विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शाह मंगळवारी अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी 1 वाजता बैठक आटपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होणार आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने अमित शाहाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी शाहाच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, ज्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे, त्या बाळापूर रोडवरच्या तुषार सेलिब्रेशन हॉल आणि रिधोरा गावाजवळ अमित शहांच्या स्वागताचा लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञातांनी फडले आहे. अमित शाह हे उद्या बाळापुर रोडवरच्या हॉटेल ग्रँड जलसा येथे साधणार सहा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. अशातच आता अमित शहांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. 


मराठा आंदोलकांनी फाडले शाहांच्या सभेच बॅनर 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढले असून, त्यात आता अमित शाह यांची भर पडली आहे. नुकताच गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दौरा केला असतांना, आता अमित शाह महाराष्ट्राचा दौरा होत आहे. दरम्यान, शाहाच्या दौऱ्याला काही स्थानिकांकडून कडाडून विरोध होतांना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर उद्या होणाऱ्या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन केले जाऊ देत नाही. त्यामुळे आमच्या गावात देखील  बॅनर लावतांना ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी, अन्यथा बॅनर लावू देणार नाही. असे म्हणत मराठा आंदोलकाने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या