- सकाळी 11.20 वाजता मुंबई विमानतळावर दाखल
- दुपारी 12 वाजता 370 कलमासंदर्भात व्याख्यानासाठी नेस्को संकुल गोरेगाव या कार्यक्रमस्थळी आगमन
- दुपारी 1.45 च्या सुमारास नवं नियुक्त मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेपियनसी रोड येथील निवासस्थानी भेट
- त्यांनतर दुपारी 2.30 च्या सुमारास राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट
- संध्याकाळी चर्चगेट येथे जय हिंद कॉलेजच्या एका कार्यक्रमात उपस्थिती
- कार्यक्रमानंतर संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. या वेळेत आगामी निवडणुकीच्या आढावा बैठका होऊ शकतात.
- आजच्या या कार्यक्रमानुसार अमित शाह यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट ठरलेली नाही.
भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईत, युतीचा तिढा सुटणार?
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2019 11:01 AM (IST)
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची आणखी एक मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीत रखडलेले पक्ष प्रवेश उरकले जाणार आहेत. मात्र नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
Getty Images)
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द कअमित शाहरण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे. गोरेगावमधील नेस्को संकुलात अमित शाहांचा हा कार्यक्रम होणार आहे. या दौऱ्यादरम्यान अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भेटीत युतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्यास आजच अमित शाह यांच्या उपस्थितीत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची आणखी एक मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीत रखडलेले पक्ष प्रवेश उरकले जाणार आहेत. मात्र नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या प्रवेशाचं नक्की काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. Maharashtra Assembly Election Opinion Poll । राज्यात भाजपचीच सत्ता येणार, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज | भाग 1 अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा कसा असेल?