मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 26 Jan 2017 09:51 AM (IST)
पुणे: ग्रामीण रुग्णालयाच्या भरधाव अॅम्ब्युलन्सला भीषण अपघात झाला. अॅम्ब्युलन्स झाडावर आदळल्याने, पेशंटसह तिघांचा मृत्यू झाला. शिरुरजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली. न्हावरे ग्रामीण रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स भरधाव निघाली होती. या अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णासह दोन नातेवाईक होते. रुग्णाला घेऊन जाताना मध्यरात्री अॅम्ब्युलन्स झाडावर आदळली. त्यामुळे अॅम्ब्युलन्समधील तिघांचा मृत्यू झाला. यापैकी एकाचा जागेवरच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अॅम्ब्युलन्सचा चालक गंभीर जखमी आहे.