तुमसर तालुक्यातील आंबागढ येथे आदीवासी विद्यार्थ्यांसाठी समर्थ अनुदानित आश्रम शाळा आहे. याच आश्रम शाळेतील 34 विद्यार्थी दहावीच्या वर्गात असून त्यांचे दहाव्या वर्गाचे परीक्षा फॉर्मचा भरण्यात आलेले नाही. आश्रम शाळेची मान्यता रद्द करून त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्यात यावं, असे पत्र प्रकल्प कार्यालयातून देण्यात आले आहे. मात्र, अद्याप विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्यात आलेले नाही. तर, दुसरीकडे परिक्षा फॉर्म न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने स्थानिक लोक प्रतिनिधींनी रोष व्यक्त केलाय.
विद्यार्थ्यांचा ठिय्या -
या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी विद्यार्थ्यांसोबत आदिवासी प्रकल्प कार्यालय भंडारा येथे ठिय्या आंदोलन केले. जो पर्यंत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणार नाही, तो पर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका उदापूरे यांनी घेतली आहे. आदिवासी विभागामार्फत कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. आता या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात येणार असून त्यांना परिक्षेला बसता येईल, असं आश्वासनही देण्यात आलंय. शाळेने विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही आदीवासी विभागामार्फत दिलाय.
दहावीचं वेळापत्रक जाहीर -
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. मंडळाने परिक्षांचं सविस्तर वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर केलं. फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत एकाचवेळी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा होणार आहे.
Board Exam | दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळपत्रक जाहीर | ABP Majha