Ambadas Danve Nanded News : गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सर्वात मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. राज्यात सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यात झालेले आहे. त्यामुळं सरकारनं कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी आले होते.


कृषीमंत्र्यांनी स्त्यावर उभे राहून त्यांनी 20 मिनिटांत पाहणी उरकली


दरम्यान, यावेळी अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील टीका केलीय. कृषीमंत्र्यांची पाहणी म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे दानवे म्हणाले. नांदेडासाठी विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी यावेळी दानवे यांनी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री हे नांदेड जिल्ह्यात आले होते. त्यांनी नुकसानीचे पाहणी करण्याचा दौरा केला तो निव्वळ फार्स असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. वाशिम येथून परत येताना रस्त्यावर उभे राहून त्यांनी 20 मिनिटांत पाहणी उरकली. त्यामुळं हा फार्स असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.


अतिवृष्टीमुळे राज्यातील 19 जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान 


अतिवृष्टीमुळे राज्यातील 19 जिल्ह्यात 20 लाख 12 हजार 775 एकर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग  यासह अन्य पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्यात सर्वाधिक 7 लाख 13 हजार 857 एक्कर क्षेत्राचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून  त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 392 एकर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झालंय. मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात असल्याचही भरणे यांनी सांगितले, या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं भरणे यांनी सांगितलंय. पावसामुळे पाणीपुरवठा, वीज आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 


सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हे कोणते?


नांदेड :  285543 हेक्टरवरकील पिकांचे नुकसान
वाशिम 164557 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
यवतमाळ 80969 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
बुलढाणा 74405 हेक्टरवरल पिकांचे नुकसान
अकोला 43703 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
 सोलापूर 41472 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
हिंगोली 40000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान 


महत्वाच्या बातम्या:


मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका, 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषीमंत्र्यांची माहिती