पंढरपूरः आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज झालं आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेली भक्तांची मांदियाळी देखील पंढरपूरात दाखल झाली आहे. तर कित्येक दिंड्या पंढरपूरच्या वाटेवर आहेत. सर्व दिंड्या पहाटेपर्यंत पंढरपुरात दाखल होतील.

 

 

पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होईल. त्यापूर्वी सालाबादप्रमाणे मंदिर समितीमार्फत विठ्ठल - रुक्मिणीची पाद्यपूजा आणि नित्यपूजा करण्यात येईल.

 

 

या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन आणि सरकारी यंत्रणेमार्फत चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान गेल्या वर्षीपेक्षा यंदा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या चांगलीच घटली असल्याचं बोललं जात आहे.