Hasan Mushri : विधानसभेला (Vidhansabha) पराभव झाला तरी अजितदादांना (Ajit Pawar) सोडणार नाही, अशी शपथ सर्व आमदारांनी घेतल्याचे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केलं आहे. काल मुंबईत अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी अजितदादांना न सोडण्याची शपथ घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नवीन मालक रोहित पवार यांनी जे आमंत्रण दिले त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही असंही मुश्रीफ म्हणाले.


 एनडीएच सरकार येते याचा आनंद 


या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं, असा आवाहन करत आम्ही प्रचार करत होतो. मोदी यांनी दहा वर्षात केलेली काम ही सुध्दा महत्वाची असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. उद्या 9 जूनला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. आम्हाला जागा थोड्या कमी असल्या तरी पुन्हा एकदा एनडीएच सरकार येणार आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. 


शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं मला वाटत होतं


संजय मंडलिक यांच्या मताधिक्यावरुन आरोप प्रत्यारोप करण्याची गरज नाही. मंडलिक गटाचे कार्यकर्ते तालुक्यातील गावागावात आहेत. त्यांना माहित आहे कोणी प्रामाणिकपणे काम केले असेही मुश्रीफ म्हणाले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं मला वाटत होतं. महाराज तीन लाख मतांनी निवडून येतील असं वाटलं होतं, पण ते एक लाख 48 हजार मतांनी निवडून आल्याचे मुश्रीफ म्हणाले. आमच्या लोकांनी काम केले की नाही हे लोकांनी पाहिलं आहे. त्यामुळं कोणाला पुरावा देण्याची गरज नाही असंही मुश्रीफ म्हणाले.


नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान, आमच्याकडे यायला सर्वांच्या वाटा सुकर


शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे. राज्यात 11 जागा या शक्तिपीठ महामार्गामुळे गेल्या आहेत. कोल्हापुरातही त्याचा फटका बसल्याचे मुश्रीफ म्हणाले. आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटून हा रस्ता रद्द करायला लावू असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. हे पाहता सर्वांच्या वाटा आमच्याकडे यायला सुकर झाल्या असल्याचे मुश्रीफ म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Hasan Mushrif: मला काच फोडण्याची, पेपर फाडण्याची, फोन बंद करण्याची कधी वेळ आली नाही; हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंना खोचक टोला