मालेगाव : राज्यात आठवड्याभरात तीन महापालिकांची निवडणूक आहे. यामध्ये पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तीन महापालिकांचा समावेश आहे. मालेगाव महापालिकेसाठी 24 मे रोजी मतदान आणि 26 मे रोजी निकाल आहे.


मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागांसाठी मतदान होणार आहे. भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी, जनता दल आणि काँग्रेस या पक्षांची मुख्य लढत असणार आहे.

एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचचा अहवाल

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी संयुक्तपणे मालेगाव महापालिका निवडणुकीचं विश्लेषण करुन अहवाल प्रसिद्ध केला आहे. मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी लढणाऱ्या 374 पैकी 358 उमेदवारांचं सर्वेक्षण आणि विश्लेषण या संस्थांनी केले आहे. विशेषत: आर्थिक बाजू, गुन्हेगारी पार्श्वभूमी यांची आकडेवारीवर अहवालात अधिक भर आहे.

किती उमेदवारांवर गुन्हे?

  • एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांच्या अहवालानुसार, 358 उमेदावारांपैकी 54 उमेदवार म्हणजेच 15 टक्के उमेदवारांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

  • 258 उमेदावांरांपैकी 37 उमेदवार म्हणजे 10 टक्के उमेदवारांवर अत्यंत गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.


पक्षनिहाय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

  • काँग्रेसच्या 62 पैकी 15 उमेदवारांवर (24 टक्के) गुन्हे

  • भाजपच्या 56 पैकी 8 उमेदवारांवर (14 टक्के) गुन्हे

  • राष्ट्रवादीच्या 51 पैकी 8 उमेदवारांवर (16 टक्के) गुन्हे

  • एमआयएमच्या 34 पैकी 7 उमेदवारांवर (21 टक्के) गुन्हे

  • शिवसेनेच्या 36 पैकी 2 उमेदवारांवर (8 टक्के) गुन्हे

  • जनता दल सेक्युलरच्या 10 पैकी 2 उमेदवारांवर (20 टक्के) गुन्हे

  • 99 अपक्ष उमेदवारांपैकी 12 जणांवर (12 टक्के) गुन्हे


आर्थिक पार्श्वभूमी

  • 358 उमेदवारांपैकी 30 उमेदवार कोट्यधीश आहेत.

  • सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती 34 लाख 6 हजार एवढी आहे.


सर्वात श्रीमंत उमेदवार

  • भाजपचे नरेंद्र जगन्नाथ सोनावणे हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून, ते 8D वॉर्डातून लढत आहेत.

  • सोनावणे यांची संपत्ती 16 कोटींहून अधिक आहे.


सर्वात कमी आणि शून्य संपत्ती

  • 48 उमेदवारांची संपत्ती अत्यंत कमी आहे. म्हणजेच 1 लाखांहून कमी संपत्ती आहे.

  • यशवंत काळू खैरनार यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती शून्य असल्याचे सांगितले आहे. खैरनार हे 10C वॉर्डातून महापालिकेच्या रिंगणात आहेत.


आयटीआरनुसार सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार

  • 358 पैकी 3 उमेदवारांचं वार्षिक उत्पन्न सर्वाधिक म्हणजेच 10 लाखांहून अधिक आहे.


वयाने लहान-मोठे उमेदवार

  • 13 उमेदवारांचं वय 21 ते 24 वर्षांदरम्यान आहे.

  • 254 उमेदावारांचं (71 टक्के) वय 25 ते 50 वर्षांदरम्यान आहे.

  • 90 उमेदवारांचं (25 टक्के) वय 51 ते 80 वर्षांदरम्यान आहे.

  • वॉर्ड क्र. 7D मधून लढणारे रशीद अकरीम शेख यांचं वय 83 वर्षे आहे.


स्त्री-पुरुष

  • 358 उमेदवारांपैकी 197 म्हणजेच 55 टक्के उमेदवार पुरुष आहेत

  • 161 उमेदवार म्हणजेच 45 टक्के उमेदवार स्त्रिया आहेत.