Maharashtra Weather Forecast : सकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Rain News) हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर, कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोलापूर आणि पंढरपूरमधील पावसामुळे शेतात पाणीच पाणी (Maharashtra Rain News) झाले. पंढरपुरमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते. आता परिस्थिती पूर्वरत होतेय, पण पावसाचा अंदाज आहे. 


राज्यात मान्सून दाखल झालाय. कोकण आणि सोलापूरमध्ये मान्सून धडकलाय. आता पुढील चार दिवसांत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. पुढील चार आठवडे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


मुंबई, ठाणेसह या भागात पावसाची शक्यता


मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.


सोलापुरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस - 


रोहिणी नक्षत्राने सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात झाली आहे. जिल्यातील 91 पैकी 82 महसुली मंडळांत 5 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ  आणि करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन-चार मंडळ वगळता इतर मंडळांत पाऊस पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 102.5 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 30.7 मि.मी. पाऊस पडला असून जवळपास ३० टक्के इतका पाऊस 5 जूनपर्यंत पडला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात मान्सूनच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले. विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली. मलिकपेठ,हिंगणी, बोपले या भागातील कोरड्याठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहत होते. दुष्काळसदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला मिळाला दिलासा मिळाला. 


पंढरपूर परिसरात तुफानी पावूस ,रस्त्यावर पाणीच पाणी  


पंढरपूर शहर व  तालुक्याला काल रात्री मेघगर्जनेसह झालेल्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले . सायंकाळी सात क्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने परिसराला जोरदार झोडपून काढल्याने ठिकठिकाणी पानीच पाणी झाले होते. प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या पंढरपूरकरांना संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे आल्हाददायक दिलासा मिळाला. रात्री  सुरू झालेल्या दमदार पावसाने सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते. यामुळे आपले कामकाज आटोपून घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. मात्र मान्सूनच्या आगमनानंतर झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. तसेच या पावसामुळे पिण्याचा पाण्याची सोय होणार आहे.


अहमदनगर शहरासह परिसरात पावसाची हजेरी


अहमदनगर शहरासह परिसरात भल्या सकाळीच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कालपासून अहमदनगरमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. पावसाच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाल्याने नगरकरांची उकड्यापासून सुटका झालीये.तर या पावसाच्या हजेरीने बळीराजा देखील सुखावला आहे. पावसाच्या हजेरी सोबतच आता खरिपाच्या पेरणीला वेग येणार आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी देखील साचायला सुरुवात झाली आहे. 


जालना जिल्ह्यात आजपासून तीन दिवस येलो अलर्ट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.


जालना जिल्ह्यात आजपासून तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 7 ते 10 जून दरम्यान वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा आव्हान केला आहे. सात जून ते 10 जून दरम्यान विजेच्या कडकडाटासह तासी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येलो अलर्ट जारी करून दक्षता घेण्याचा आवाहन केले आहे.


सांगलीत भर पावसात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा  


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा  राज्याभिषेक सोहळा सांगलीत प्रचंड उत्साहात साजरा झाला. पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनकडून मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती उभारण्यात आली होती. 


या सोहळा सुरू असताना वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. वरुणराजाच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा  राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी पुतळ्यासमोर शिवज्योतीचे द्वितीय वर्ष पूर्तीही साजरी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनकडून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला गेला. 


आणखी वाचा :


Monsoon 2024 : मुंबईत मान्सूनच्या सरी कधी कोसळणार? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज