बीडमधील सामूहिक विवाह सोहळ्याला अक्षय कुमारची उपस्थिती, 79 नवदाम्पत्यांना प्रत्येकी 1 लाखाची मदत
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2019 11:03 PM (IST)
अक्षयने मराठीत संवाद साधून उपस्थिताची मनं जिंकली. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अक्षयने ग्रामविकास आणि महिला बालविकास पंकजा मुंडेंचंही अभिनंदन केलं.
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलं होतं. या सामूहिक विवाह सोहळ्याला बॉलिवडूचा अभिनेता अक्षय कुमार खास उपस्थित होता. या विवाह सोहळ्यात दुष्काळग्रस्त भागातील 79 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. अक्षय कुमारने सर्व 79 नवदाम्पत्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. अक्षयने मराठीत संवाद साधून उपस्थिताची मनं जिंकली. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अक्षयने ग्रामविकास आणि महिला बालविकास पंकजा मुंडेंचंही अभिनंदन केलं. व्हिडीओ- मराठीतून संवाद साधून अक्षयने उपस्थितांची मनं जिंकली