कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. लढणे आणि पुढे जाणे हे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलो आहोत. सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रुप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मला विश्वास आहे की, आपला जिल्हा, आपली गल्ली पहिल्यापेक्षाही सुंदर आणि आनंदी होईल.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पुरामुळे सांगलीत 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थानांतरीत झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात 104 गावे व महानगरपालिका क्षेत्र यामधून 64 हजार 646 कुटुंबे स्थानांतरीत झाली. त्यातील 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थानांतरीत झाल्या. यांची सोय 64 तात्पुरत्या निवारण केंद्रामधून करण्यात आली. तर जिल्ह्यात 26 लोकांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बेपत्ता आहे.
तर कोल्हापुरात 2 लाख 45 हजार 229 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात एकूण 50 गाई, 42 म्हशी, 23 वासरं, 58 शेळ्या 11 हजार 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून एकूण 25 लाख 17 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.