अकोला: खडाजंगीसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला महापालिकेत आज पुन्हा एकदा राडा सुरु आहे. यावेळी मात्र नगरसेवकांनी वादावादीचं टोक गाठलंय. कारण महासभेत भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी अस्वच्छतेच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी सभागृहात चक्क डुकराचे पिल्लू आणलं. कचऱ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला. महापौर आणि भाजपा नगरसेवकांमध्ये तू तू-मै मै झाली. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी टेबल उलटून सभागृहात गोंधळ घातला. करवाढीच्या मुद्द्यावरुनही राडा अकोला महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होत आहे. करवाढीच्या मुद्द्यावर भारिप -बहुजन महासंघ भाजपच्या सत्ताधाऱ्यांना घेराव घालण्याच्या रणनितीत आहेत. यासाठी भारिपकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्याचं नेतृत्व भारिप-बहुजन संघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर करणार आहेत.