Akola Farmers News : आधीच अतिवृष्टीच्या 'अस्मानी' संकटात सापडलेला अकोला जिल्ह्यातील शेतकरी आता सरकारी व्यवस्थेच्या संवेदनाशून्य 'सुल्तानी' संकटात सापडला आहे. यातूनच अकोला (Akola) जिल्ह्यातील दिनोडा गावातील शेतकऱ्यांच्या (Farmers) माथी फक्त 3, 5, 8 आणि 21 रुपयांच्या मदतीचे धनादेश मारण्यात आलेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे हे पैसे मिळाले आहेत. सरकार (Govt) आणि प्रशासनानं यातून आपली थट्टा केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानीपोटी मिळालेले पिक विम्याचे पैसे अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केले आहेत.
20 ते 25 शेतकऱ्यांनी आज धनादेश सरकारकडे केले परत
अकोला (Akola) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 3,5,8,21 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत. या शेतकऱ्यांनी शासनाला पैसे परत केले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश मिळाले आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत मिळालेली मदत ही तुटपुंजी व अपमानास्पद असल्याचं सांगत आज या शेतकऱ्यांनी हे धनादेश अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केलेत. जवळपास 20 ते 25 शेतकऱ्यांनी आज धनादेश सरकारकडे परत केलेत. शासनाने आता तरी शेतकऱ्यांची थट्टा करणे थांबवावे, अशी विनंती या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. काँग्रेसनेही यावर जोरदार टीका करीत सरकार असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे.
पिक विमा योजनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण
पिक विमा ही एक योजना आहे जी नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देते. महाराष्ट्रात ही योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणून राबवली जाते. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मिळून विमा हप्ता भरतात. नवीन नियमांनुसार, काही पिकांसाठी विमा हप्त्याचे दर बदलले आहेत आणि पीक पाहणी बंधनकारक केली आहे. महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' राबवण्यात येते. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतातील पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. महाराष्ट्र सरकारनं 2023 मध्ये केवळ 1 रुपया भरून 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागी होण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. तिलाच '1 रुपयात पीक विमा योजना' असं म्हटलं जाऊ लागलं. पण सध्या 1 रुपयात पिक विमा बंद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या: