भरारी पथकाने अजित पवारांची गाडी अडवली!
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2017 12:10 PM (IST)
पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे सध्या भरारी पथकांकडून गाड्यांची तपासणी सुरु आहे. या भरारी पथकांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही सुटले नाहीत. बारामतीमध्ये भरारी पथकानं अजित पवारांच्या गाडीची कसून तपासणी केली. विशेष म्हणजे अजित पवार यांनीही गाडी थांबवून भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं. मात्र त्यांच्या गाडीत भरारी पथकाला काहीही संशयास्पद आढळलं नाही. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अजित पवार रान पिंजून काढत आहेत. बारामतीत आज पाच ठिकाणी त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.