'पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही', मावळ लोकसभा मतदार संघाबाबत मुंडेंचं सूचक वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2019 07:13 AM (IST)
मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढवणार आहेत. हे जवळपास निश्चित झाले आहे, असेच म्हणावे लागेल.
NEXT PREV
पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढवणार आहेत. हे जवळपास निश्चित झाले आहे, असेच म्हणावे लागेल. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तसे संकेत दिले आहेत. निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान पिंपरीत आयोजित एका सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, "माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभेसाठी खूप वर्ष झिजलेत. आता त्यांना मावळ लोकसभेत आशीर्वाद द्या." असे आवाहन करताना मुंडे यांनी महाभारतातील संदर्भ जोडत म्हटले की, "श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजेच पार्थाला म्हणाले होते, 'उठ पार्था तुझ्या शिवाय आता पर्याय नाही.' असे म्हणत असताना मुंडे यांनी पार्थ पवार यांचे निवडणूक लढण्याचे संकेत दिले.