बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहने चालवताना तपासून चालवावी असा सल्ला दिला आहे. गाडीचे टायर गोटा होईपर्यंत चालवू नका अपघात कधी होईल हे सांगता येत नाही. यावेळी अजित पवार यांनी ते खासदार असताना त्यांच्या जीवनात घडलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. खराब टायरमुळे एका अपघातातून बालंबाल बचावलो. नाहीतर तुम्हाला आज तुमच्यासमोर दिसलोच नसतो असे अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांनी काल रात्री बारामतीजवळ पणदरे येथे छोट्या पानटपरीवर जाऊन पान खाण्याचा आस्वाद घेतला. शिवाय कुठले पान ठेवता? किती धंदा होतो? ही माहिती देखील त्यांनी घेतली.
अजित पवारांनी आज बारामतीमध्ये विविध प्रकारच्या आठ कार्यक्रमांना त्यानी हजेरी लावली. यात एका टायरच्या शोरुमच्या उद्घाटनप्रसंगी त्यानी त्यांच्या जीवनात घडलेला अपघाताचा किस्सा सांगितला.
पवार म्हणाले, आमदार झाल्यानंतर जुन्या मुंबई-पुणे मार्गावरुन जात असताना समोरुन एक भरधाव ट्रक येत होता. माझ्या गाडीला पास करत असताना त्या ट्रकचा उजवीकडचा टायर बस्ट होण्याऐवजी डाव्या बाजूचा टायर अचानक बस्ट झाला. तो ट्रक एका भिंतीला जाउन धडकला. जर त्या ट्रकचा उजवीकडचा टायर बस्ट झाला असता तर आता अजित पवार तुमच्या समोर दिसला नसता, असे ते म्हणाले.
गाडीचे टायर गोटा होईपर्यंत चालवू नका, अजित पवारांचा सल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2019 06:14 PM (IST)
अजित पवार यांनी ते खासदार असताना त्यांच्या जीवनात घडलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. खराब टायरमुळे एका अपघातातून बालंबाल बचावलो. नाहीतर तुम्हाला आज तुमच्यासमोर दिसलोच नसतो असे अजित पवार यांनी सांगितलं.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -