नागपूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून दुसरी अपेक्षा करु शकत नाही, असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला. तर अजित पवारांच्या वक्तव्यावरुन सरकार शिक्षणाविरोधात असल्याचं दिसतं, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं. अजित पवारांनी पीएचडीधारक विद्यार्थ्यांची थट्टा करु नये, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.
मनोज आखरे म्हणाले, हे असंवेदनशील सरकार आहे. शिक्षणाबद्दल अनास्था दिसून येते,पीएचडी करून केवळ नोकरी मिळत नसते तर संशोधन करण्यात येते. देशात केवळ 0.5 टक्के विद्यार्थी पीएचडी होतात. सारथीसाठी दिलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांची सी ई टी परीक्षा घेण्यात येईल असं कुठेही उल्लेख नव्हता. त्याविरोधात 45 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 1329 पात्र विद्यार्थी झाले जाहिराती नुसार पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान करावी.
विद्यार्थ्यांची थट्टा करू नये : अंबादास दानवे
अजित पवारांच्या वक्तव्यावरून या सरकारचा माज जो आहे त्यातून सप्ष्ट होत आहे. आमच्या आदर्शाने शिक्षणाचा पाया रोवला आणि ज्या पद्धतीने अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. त्यावरून हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, असे नाना पटोले म्हणाले.
पीएचडी धारक विद्यार्थ्यांची थट्टा करू नये, काल सभागृहात थट्टा झाली, असे अंबादास दानवे म्हणाले.
अजित पवारांविरोधात कोल्हापुरात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या राजकारणावर एखादा विद्यार्थी पीएचडी करेल ही अजित पवारांना भीती आहे का? असा खडा सवाल पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी केला आहे. अजित पवार यांनी काल विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणे गरजेचे आहे. देशात आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी पीएचडी मिळवली आहे त्या सगळ्यांचा अपमान अजित पवार यांनी केला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. मात्र, ती केवळ 200 विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. यावर, राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे.
हे ही वाचा :