पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये पिछेहाट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाची निवडणूक लढवू नये, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


आधीच बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्यामुळे पुरती इज्जत गेली आहे, आता पुन्हा हार नको, त्यामुळे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरपदाची निवडणूक लढवू नयेत, असे आदेश अजित पवारांनी दिल्याचं म्हटलं जातं.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील 128 जागांपैकी 77 जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. तर गेल्या तीन टर्म एकहाती सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला फक्त 36 जागा मिळाल्या. त्यामुळेच विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची राष्ट्रवादीची तयारी असली तरी महापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी माघार घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पिंपरी चिंचवडमधील पक्षीय बलाबल

  • भाजप - 77

  • शिवसेना - 9

  • काँग्रेस - 0

  • राष्ट्रवादी - 36

  • मनसे - 1

  • इतर - 5