Maharashtra Petrol Diesel Update :  सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्यावरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. आज कार्तिकी एकादशी (Kartiki Eksadashi) निमित्त त्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. 


त्यांनी म्हटलं की, पेट्रोल आणि डिझेलच्यावरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार ,पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार यांनी सांगितले.


Kartiki Ekadashi 2021 : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शासकीय पूजा


एसटी विलिनीकरण केले तर अनेक जण मागणी करतील
एसटी संपाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. एसटी विलनीकरण केले तर अनेक जण तसेच मागणी करतील. गेल्या 60 वर्षात कधी एसटीच्या सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा समोर आला नव्हता मात्र मुद्दाम हा प्रश्न चिघळवला जात आहे. असे झाले तर राज्यातील सर्व महामंडळाचे कर्मचारी देखील अशी मागणी करतील. असे सांगत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलीस पाटील हे देखील मागणी करू शकतात, असं पवार म्हणाले. 


कोरोना संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा सतर्कतेचे आवाहन केले. त्यांनी म्हटलं की, रशिया, चीन आणि युरोप देशात पुन्हा कोरोना वाढू लागल्याने कोरोना बाबत सर्व नियम पाळावे लागतील.