सोलापूरः महादेव जानकर यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरितबुद्धी आहे, त्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी जानकरांवर खोचक शब्दात टीका केली आहे.


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं. भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना जानकर यांनी अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती.

महादेव जानकर यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे


महादेव जानकरांच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

जानकरांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आज पुणे, ठाणे, औरंगाबाद, जालन्यासह अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महादेव जानकरांच्या पुतळ्याला जोडे मारले. तसंच जानकरांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

जानकरांच्या विधानानंतर राष्ट्रवादी-रासप कार्यकर्त्यांमध्ये घमासान


बारामतीत जानकर समर्थक किशोर मिसाळ यांच्या घरावर आणि गाडीवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

data-sessionlink="ei=v0X-V5KnDsWUugLH8pWQDA">बारामतीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाहीः महादेव जानकर


पुण्यात अज्ञातांनी बारामती होस्टेलमध्ये घुसून शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जनवाडी पोलीस ठाण्यासमोर रासपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. तर ठाणे, जालन्यातही जोरदार घोषणाबाजी करुन जानकरांचा निषेध करण्यात आला.