मुंबई : महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

जानकरांच्या विधानानंतर राष्ट्रवादी-रासप कार्यकर्त्यांमध्ये घमासान


दसरा मेळाव्याला भगवानगडावर काल भाषण करताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी, अजित पवार आणि धनंजय मुंडेवर आक्षेपार्ह टीका केली होती. "बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही," असा घणाघात जानकरांनी अजित पवारांवर केला. त्याविरोधात राज्यभर विविध ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

‘बारामती’चं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही : महादेव जानकर


एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा, असा उल्लेख करत महादेव जानकरांनी विधानपरिषद, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याचा अपमान केला. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार आहोत, असंही मुंडे यांनी सांगितलं.

नेतृत्त्व टिकवण्यासाठी जानकरांचा प्रयत्न

बारामती हॉस्टेलमध्ये घुसून पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न


स्वत:चं नेतृत्त्व टिकवण्यासाठी महादेव जानकर यांचा प्रयत्न होता. भगवानगडाच्या पायथ्याला येऊन अशी भाषा बोलणं, एखाद्या मंत्र्याला शोभनीय नाही. आम्हाला अशी भाषा बोलता येत नाही. आम्ही यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या संस्कारात घडलो आहोत.