आता कुणाच्या डॅडीला घाबरणार नाही: अजित पवार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 28 Dec 2016 07:23 PM (IST)
पुणे: दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी तोलूनमापून बोलणार असं सांगितलं. त्यानंतर आज तोलूनमापून म्हणजे कसं याची व्याख्याच त्यांनी म्हणून दाखवली. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 'आता मी तोलूनमापून बोलणार म्हणजे असं... आम्ही गावकडे म्हणतो की, 'कुणाच्या बापाला घाबरण्याच कारण नाही.' पण आता तसं नाही बोलायचं, आता असं म्हणायच की... नाही मी कुणाच्या वडिलांना घाबरणार नाही, मी कुणाच्या डॅडीला घाबरणार नाही.' असं म्हणत अजित पवारांनी तोलूनमापून म्हणजे काय ते सांगितलं. 'बापाला घाबरणार नाही म्हटलं की तुम्ही म्हणता अजित पवारची जीभ घसरली. पण वडिलांना घाबरणार नाही असं म्हटलं की जीभ घसरली असं म्हणत नाही आणि डॅडींना घाबरत नाही असं म्हटलं की तर अजिबातच म्हणणार नाही की जीभ घसरली.' असा उपरोधिक टोला अजित पवारांनी हाणला. संबंधित बातम्या: VIDEO: ...तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरत नाही: अजित पवार