सातारा : साताऱ्यातील सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांचा खच पडला आहे. साताऱ्यातील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. तसंच रथावर मोठ्या प्रमाणावर पैसेही लावले जातात.
साताऱ्यातील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव प्रसिद्ध आहे. या रथोत्सवाला राज्यासह शेजारील राज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. तसंच या उत्सवावेळी रथावर पैसेही लावले जातात. नोटाबंदीनंतरही यावर्षी रथावर मोठ्या प्रमाणावर पैसे लावण्यात आले आहेत. यावर्षी तब्बल 56 लाख रुपये या रथोत्सवावेळी जमा झाले आहेत.
दरवर्षी नोटांनी भरणारा रथ यावर्षीही भरत आला आहे. रथावर 10, 20, 50, 100च्या नोटांसह 500 आणि 2000 च्या नव्या नोटाही उधळण्यात आल्या आहेत.
यापूर्वी गुजरातमध्येही भजनसंध्या कार्यक्रमात जुन्या नोटांसह पाचशे आणि 2000 च्या नव्या नोटा उधळल्या होत्या.
संबंधित बातम्या :
गुजरातमध्ये पुन्हा नोटांचा पाऊस, भजनसंध्या कार्यक्रमात नोटांची उधळण
भक्ती संगीत कार्यक्रमात 2 हजारांच्या नव्या नोटांचा पाऊस