Maharashtra Politicis : राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. यामध्ये 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. याबाबत सध्या चर्चा बैठका सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची नावं अंतिम करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
आज साडे नऊ वाजता सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पाऊण तास बैठक पार पडली आहे. या बैठकीत खातेवाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बैठकीत राष्ट्रवादीच्या 9 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पदाची नावे अंतिम झाल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांची दिली आहे.
मुंबईऐवजी आता नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार?
राज्यात महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून आमदारांच्या गाठीभेटी आणि बैठका होत आहे. त्यामध्ये, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदारही उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर येत आहेत. त्यातच, अजित पवारांच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून मुंबईऐवजी आता नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार (Ministry Expansion) करण्यात येणार असल्याचं निश्चित झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीचे 10 आणि शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे नागपुरात (Nagpur) पहिल्यांदाच मंत्र्यांचा शपथविधी होत आहे.
नागपुरात रविवारी दुपारी 3.00 वाजता होणार मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा
नव्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबर रोजी उपराजधानी नागपूरात होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपाल यांचं निवासस्थान असलेल्या राजभवनात होईल की विधान भवनात हे स्पष्ट नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात रविवारी दुपारी 3.00 वाजता होणार असल्याचे समजते. त्या संदर्भात राजभवनात तयारीही सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून लागून राहिलेली उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. राज्यातील फडणवीस सरकारचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे, आमदारांच्या सोईसाठी हा शपथविधी 15 तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. 16 तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे 15 तारखेला नागपुरात शपथविधी होऊ शकतो, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या: