मुंबई : अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.  विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ नेत्याची निवड करण्याचे सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधीमंडळ नेत्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, हसन मुश्रीफ या सर्वांनी अजित पवारांच्या नावाला अनुमोदन दिले. अखेर एकमताने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.


तत्पूर्वी विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीत अनेकजण स्पर्धेत होते. विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर होतं. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी सांभाळली आहे. तो अनुभव पाहता त्यांचं नाव या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावंही विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत होती. मात्र अजित पवारांच्या निवडीनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, आज(बुधवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रदेश कार्यालयात आल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी अजित पवार, रोहित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे असे सर्वच नेते उपस्थित होते. शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या सर्वच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी धनंजय मुंडे यांचा उल्लेख विक्रमी मुंडे असा करण्यात आला. यानंतर सभागृहात सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. या निमित्ताने राष्ट्रवादीचं ऑफिस सजवण्यात आलं होतं.

Ajit Pawar | राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो : अजित पवार | मुंबई | ABP Majha



2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत समोर आला आहे. दुसऱ्या स्थानी 56 जागांसह शिवसेना आहे. मात्र 2014 च्या तुलनेत यंदा भाजपला 17 जागां तर शिवसेनेला 7 जागांचा फटका बसला आहे. राष्ट्रवादीला 54 जागा तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीला अनुक्रमे 2 आणि 13 जागांचा फायदा झाला आहे.

...त्यामुळे उदयनराजेंचा पराभव झाला : श्रीनिवास पाटील | Pune | ABP Majha



विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, 'या' नेत्यांची नावं चर्चेत