Radhakrishna Vikhe Patil, Ashok Chavan : ज्यांना चर्चेला पाठवलं तोच भाजपला जाऊन मिळाला अशीच काहीशी अवस्था काँग्रेसची राज्यांमध्ये राहिली आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता 2024 मध्ये सुद्धा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्याच मार्गावर असल्याने राजकीय वर्तुळात एकच खरबळ उडाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला समावेश करून घेण्यासाठी काँग्रेसकडून चर्चेमध्ये अशोक चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता. आता तेच अशोक चव्हाण भाजपच्या मार्गावर गेल्याने वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला चिमटा काढत सवाल केला आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली यांनी यांनी ट्विट करत काँग्रेसला सवाल केला आहे.






अंजली आंबेकर यांनी म्हटले आहे की,  2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना व्हीबीएशी युतीच्या चर्चेसाठी नियुक्त केले होते. ते भाजपमध्ये गेले. 2024 च्या निवडणुकीसाठी, अशोक चव्हाण यांना केवळ आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेसनेच नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही नियुक्त केले होते. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रिय काँग्रेस, कोणाशी बोलावे? तुमचे नेमलेले नेते भाजपकडे झुकत आहेत. 


महाविकास आघाडीकडून वंचितला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी वंचितकडून येत असलेल्या अटींमुळे चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. आतापर्यंत सातत्याने वंचितकडून काँग्रेसच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या सहीला सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शवला होता. जेव्हा पहिल्यांदा चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले, त्यावेळी सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये मानापनाचे नाट्य रंगलं होते. 


इतर महत्वाच्या बातम्या