सोलापूर : कमरेखालची भाषा केल्यामुळं आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपद गमावणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.


 

“दुधानं तोंड पोळल्यामुळं ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळं जिभेवर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला”, असा महत्त्वाचा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

 

सोपलांच्या भाषणाचा समाचार

 

“आपलं बार्शीचं भाषण शिराळ्यात खूप गाजलं. महाराष्ट्रभर भाषण गाजलं. आपण कधी कधी लोक हसायला लागल्यानंतर, बोलणऱ्यालाही वाटतं की, चला, लोक हसतायेत, तर अजून हसवावं. पण नंतर मग हसवता हसवता, त्यालाच रडायची पाळी येते.” असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांच्यावर निशाणा साधला.

 

 

यावेळी अजित पवारांना खडसेंनी शेतकऱ्यांच्या मोबाईल बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्याची आवर्जून आठवण झाली. दरम्यान अजितदादांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

 

काय म्हणाले अजित पवार? पाहा व्हिडीओ :



 

दिलीप सोपल काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ :