नगरमध्ये 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी फरार
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2016 03:01 AM (IST)
अहमदनगर : लैंगिक अत्याचाराच्या आणखी एका घटनेने अहमदनगर पुन्हा एकदा हादरलं आहे. नांदगाव शिंगवेमध्ये एका 15 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्य आरोपी फरार असून एकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने घराशेजारीच राहणाऱ्या पीडित तरुणीला भांडी घासण्यासाठी बोलावलं. यावेळी कोणीच नसल्याची संधी साधत आरोपी मल्हारी उमपने साथीदाराच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या तरुणीने घरी जाऊन कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर तक्रार करण्यासाठी पीडिता पोलिसात गेली. याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला, मात्र त्याच्या साथीदाराला अटक करण्यात यश आलं आहे.