अहमदनगर : चहातून गुंगीचं औषध पाजून आरोपीने 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पतीचा अपघात झाल्याचं सांगून अहमदनगरमधील महिलेला लॉजवर बोलावण्यात आलं होतं.


चहातून गुंगीचं औषध पाजून अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात राहणाऱ्या विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. विवस्त्र फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत सात महिन्यांपासून आरोपी अत्याचार करत असल्याची फिर्याद महिलेने दिली.

आरोपी मच्छिंद्र जाधव याने अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने पारनेर पोलिस ठाण्यात केली. या प्रकरणी पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा प्रकार घडला. तुझ्या पतीचा अपघात झाला आहे, असं खोटं सांगून आरोपीने महिलेला शिरुरला बोलावून घेतलं. यानंतर चहातून गुंगीचं औषध पाजून लॉजवर अत्याचार केले, असा आरोप महिलेने केला आहे. आरोपीने विवस्त्र फोटो जाहीर करण्याची धमकी देत एप्रिल 2018 पर्यंत वेळोवेळी अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा आहे.