कुठे काय बोलावं याची मला जाण: धनंजय मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2016 02:37 AM (IST)
अहमदनगर : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही. माझ्याही शरीरात मुंड्यांचं रक्त असून कुठे काय बोलावं हे आई-वडिलांनी मला शिकवलं आहे, असं प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी पंकजांना दिलं. अहमदनगरला पाथर्डीत ते संत वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहाच्या समारोपात बोलत होते. पंकजा मुंडेंनी धार्मिक व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंसह विरोधकांवर जहरी टीका केली होती. रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाचं नातं मोठं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी पौराणिक कथांचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंवर टीका केली होती.