अहमदनगर : अहमदनगरमधील कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी आणखीन एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


 

या प्रकरणात आतापर्यंत तीनजण अटकेत होते. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळला या दोघांना पूर्वीच अटक केली आहे. तर नितीन भैलुमेला पुण्यात पहाटे अटक करण्यात आली.

 

या घटनेनंतर कर्जत परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला होता. तसेच कर्जतमधील मुख्य रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला होता. यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे अंदोलन मागे घेण्यात आले.

 

नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर