बीडः मंत्रीमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे शिवसंग्राम पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात शिवसंग्राम पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठकीचं उद्या आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

 

 

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात मेटे यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी मेटेंना खो दिल्यामुळे मेटेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता शिवसंग्राम पक्ष महायुतीतून बाहेर पडेल असं जवळपास स्पष्ट झालं आहे.

 

 

शिवसंग्राम पक्षातील काही कार्यकर्त्यांची आज बोरिवली नॅशनल पार्क येथे मेटेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बाहेर पडण्याबाबत काही निर्णय घेण्यात आले. मात्र अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.