मनमाडमध्ये भाजीपाला मार्केट अर्ध्या तासापासून ठप्प, बाजार समितीमध्ये आडतीच्या मुद्यावरुन वाद
हेडलाईन्स :
1. भाजप नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चिट, 30 कोटीच्या लाच प्रकरणात एसीबीच्या आरोपपत्रात नाव नाही, सत्तेच्या दुरुपयोगाचा काँग्रेसचा आरोप
-------------
2. नगरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाला गंभीर वळण, जामखेड, श्रीगोंदा, कर्जतमध्ये बंद, राम शिंदेंवर स्थानिकांचा संताप
-------------
3. नवी मुंबईत कुठल्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांना अभय नाहीच, तुकाराम मुंढेंनी मंदा म्हात्रेंना ठणकावलं, सोमवारच्या बंदची माहिती मुख्यमंत्र्यांनाही नाही
---------------
4. नवी मुंबईत आडत भरण्यास किरकोळ व्यापाऱ्यांची तयारी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तर नाशिकच्या व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा मात्र कायम
--------------
5. अरुणाचलमध्ये काँग्रेसनं भाजपचा सत्तास्थापनेचा डाव हाणून पाडला, ऐनवेळी बंडखोरांचा भाजपला डच्चू, पेमा खंडू अरुणाचल प्रदेशचे नवे सीएम
--------------------
6. केंद्रीय मंत्रिपदापाठोपाठ स्मृती इराणींना पुन्हा एकदा दणका, संसदीय कामकाज समितीतून हकालपट्टी, इराणींऐवजी राज्यमंत्र्यांना स्थान
---------------------
7. तुर्कस्तानात लष्करी गटाचा सत्तापालटाचा प्रयत्न फसला, धुमश्चक्रीत आतापर्यंत 250 जणांचा मृत्यू, अचानक गोळीबार करुन ताबा मिळवण्याचा प्रयत्न
-------------------
8. पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच खोट्या प्रतिष्ठेची बळी, लहान भावाकडून गोळी झाडून हत्या, बोल्ड व्हिडीओ आणि स्टेटमेंटमुळे कुटुंबाचा संताप
-----------------
9. उत्तर प्रदेशात तरुणांचा स्टंट बघून काळजाचा ठोका चुकला, रेल्वेसमोरुन थेट नदीत उड्या मारण्याचा प्रताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ
-----------------
10. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकरांचं निधन, खडतर परिस्थितीत संघाचं कार्य करणारा ज्येष्ठकर्मी हरपला, लातूरमध्ये अंत्यसंस्कार