Ajit Pawar : संग्राम जगताप (Sangram Jagtap) भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो. पण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार संग्राम जगताप यांना सल्ला दिला. संग्राम जगताप हे काही दिवसांपासून हिंदुत्ववादी मुद्दे पुढे घेऊन जात असल्याने पक्षातील काही नेत्यांनी अजित पवारांकडे तक्रार केली होती. यावर बोलताना अजित पवारांनी संग्राम जगताप यांना सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा अजित पवारांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
सामाजिक न्याय विभागासाठी महायुती सरकारने 25 हजार कोटींची तरतूद केली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांना हक्क मिळून देण्याचा अधिकार दिला आहे. सामाजिक न्याय विभागासाठी महायुती सरकारने 25 हजार कोटींची तरतूद केली असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. हे महायुती सरकार कोणतीही कमतरता पडू देणार नाही. जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणताही माय का लाल संविधान बदलू शकणार नाही असे अजित पवार म्हणाले. कोणी सोम्य गोम्या काहीही फेक नरेटिव्ह पसरवीत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या समता- बंधुता या तत्वाचं स्मरण करुन देईल
अहिल्यानगर येथील कार्यक्रम केवळ कार्यक्रम नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा- कार्याचा गौरव होता असे अजित पवार म्हणाले. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा त्यांच्या समता- बंधुता या तत्वाच स्मरण करून देईल. डॉ. आंबेडकरांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यात यश मिळवण्याची त्यांची ख्याती होती असे अजित पवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी जगात वेगळा ठसा उलटवला : विखे पाटील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी जगात वेगळा ठसा उलटवल्याचे मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. आज संपूर्ण देशामध्ये संविधान प्रमाण मानलं जातं. आज हे स्मारक प्रेरणादायी ठरणार आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर बाबासाहेब हे अहिल्यानगरमध्ये काही दिवस होते. त्यावेळी त्यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तकं लिहिलं होतं असे विखे पाटील म्हणाले. बाबासाहेबांच या जिल्ह्याशी अतूट नातं होतं असे विखे म्हणाले. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. आज याच दिवशी औरंगाबाद विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं होतं त्यामुळे हा दिवस महत्वाच असल्याचे विखे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: