राष्ट्रवादीचे 'ते' 18 नगरसेवक बडतर्फ, जिल्हाध्यक्षांनाही पदावरून काढले
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2019 04:44 PM (IST)
पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिशीद्वारे दिली होती परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली.
मुंबई : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे तर जिल्हाध्यक्षांना अध्यक्षपदावर काढून टाकण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावळण्यात आला. त्यानंतर पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिशीद्वारे दिली होती परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली. तर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणती कल्पना दिली नाही किंवा घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा केला नसल्याने जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या कारवाईत म्हटले आहे. राष्ट्रवादीचे बडतर्फ नगरसेवक 1) सागर बोरुडे 2) मीनाक्षी चव्हाण 3) दीपाली बारस्कर 4) संपत बारस्कार 5) विनीत पाउलबुद्धे 6) सुनील त्रंबके 7) खान समद वहाब 8) ज्याती गाडे 9) शोभा बोरकर 10) कुमार वाकळे 11) रुपाली पारगे 12) अविनाश घुले 13) गणेश भोसले 14) परवीन कुरेशी 15) शेख नजीर अहमद 16) प्रकाश भागानगरे 17) शीतल जगताप 18) मीना चोपडा