Ajit Pawar : अवकाळी पावसामुळं (Rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वाया गेल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. शेतकऱ्यांना (Farmers) आश्वासन मिळालं मात्र, अद्याप मदत मिळाली नसल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्याचं दु:ख पाहवत नसल्याचे अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, सभागृहात मागणी करणार
सहा मार्च ते नऊ मार्च यादरम्यान राज्यातील हवामान बदलले जाईल आणि त्यामुळं अवकाळी पाऊस आणि गारपीट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हरभरा, गहू, मका, ज्वारी, द्राक्ष, भाजीपाला, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं आज आम्ही विरोधीपक्षांच्यावतीने शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
सरकारनं शेतकऱ्यांना उभारी द्यावी
सरकारला अजूनही अंदाज आलेला दिसत नाही. धूलिवंदन, होळी असल्यामुळं बरेच मान्यवर नेते त्यामध्ये गुंतलेले होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा सण आहे. आनंद लुटला पाहिजे. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारनं करावं असे अजित पवार म्हणाले. विशेषत रब्बी पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. जिथं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे, तिथं नियमांच्या बाहेर जाऊन मदत करावी असे अजित पवार म्हणाले.
दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज
शेतकऱ्यांना मदत दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. मात्र, अद्याप मदत मिळाली नसल्याचे स्वत: शेतकऱ्यांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. बऱ्याच ठिकाणी कांद्याची खरेदी सुरु केली नाही. मका, हरभरा, गहू, द्राक्ष, आंबा मोहोर, संत्र्यांच्या बागांचे मोठं नुकसान झालं आहे. अजूनही दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं दोन दिवसात काय होईल सांगता येत नसल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्याचं होणारं नुकसान पाहवत नसल्याचे अजित पवार म्हणाले.
आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) दुसरा आठवडा सुरु होत आहे. सोमवार आणि मंगळवार अधिवेशनाचे कामकाज बंद होते. आजही विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा (Rain) शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: