Agriculture News Palghar : भात शेती (Rice Crop) हे पालघर (Palghar) जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. मात्र, सध्या जिल्ह्यातील काही शेतकरी (Farmers) पर्यायी शेतीकडे वळू लागले आहेत. पावसाळ्यानंतर (Rain) या भागात बागायती शेतीसह रब्बी पिकांकडे (Rabi Crop) शेतकऱ्यांचा कल वळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं भात शेतीत चांगलं उत्पन्न मिळत नसल्यानं पर्यायी शेतीतून पालघर जिल्ह्यातील शेतकरी आता आपली स्वतःची आर्थिक घडी मजबूत करत आहेत.
Rabi crops: रब्बी पिकापासून तीन महिन्यात दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न
पालघरमधील (Palghar)चहाडे येथील भालचंद्र पाटील यांची वडिलोपार्जित जमिन असून ते पारंपारिक पद्धतीने भात शेती करत होते. मात्र, सध्या रब्बी हंगामात त्यांनी आपल्या साडेचार एकर जागेत तीळ, हरभरा, तूर वाल याचबरोबर सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या हवामानाच्या सतत बदलाचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. भालचंद्र पाटील यांनी आपल्या दीड एकर जागेत सूर्यफुलाची लागवड केली आहे. हेच दिड एकरमधील सूर्यफूल एकदम भरुन आलेलं पाहायला मिळत आहे. या साडेचार एकरातून त्यांना रब्बी पिकापासून जवळपास तीन महिन्यात दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. पावसाळ्यातील भात कापणीनंतर भालचंद्र पाटील यांनी ही लागवड केली असून, सध्या त्यांना यापासून उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.
रब्बी पिकांचा खर्च कमी
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस भात कापणीनंतर याच जागेच्या वाफ्यांवर भालचंद्र पाटील यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. रब्बी पिकांना जास्त प्रमाणात पाण्याची गरज नसल्यानं या रब्बी पिकांची वाढ ही जमिनीतील आर्द्रतेमुळं देखील होते. त्यामुळं या रब्बी पिकांचे उत्पन्न घेताना जास्त खर्च येत नसून, अधिक नफा मिळतो. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यातील भातशेतीनंतर रब्बी पिकांकडे वळावं असं आवाहन भालचंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केला आहे.
दुर्गम भागात रब्बी पिकांची लागवड केल्यास स्थलांतर कमी होईल
पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यात भातशेती हा एकमेव पर्याय असल्यानं येथील नागरिक स्थलांतरित झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळं जर याच दुर्गम भागात रब्बी पिकांची लागवड करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. तर येथील स्थलांतरण कमी होण्यास नक्की मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या: