मुंबई: सरकारी सेवेतील प्रवेशाच्या कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 व्या वर्षांपर्यंत सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या 43 व्या वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नोकरभरतीवर र्निबधांचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांत अनेक विभागांत विविध संवर्गातील सुमारे लाखभर जागा रिकाम्या असतानाही केवळ अत्यावश्यक ठिकाणीच नोकर भरतीला परवानगी दिली जात आहे.
त्याचवेळी नोकरीसाठी पात्र असूनही संधी मिळत नसल्याने अनेक तरुण धास्तावले होते. मात्र आता ती पदे भरली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मात्र सध्याच्या ज्या घटकांची कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यात कोणतीही वाढ केलेली नाही.