सिंधुदुर्ग:  मध्य युरोप मधून स्थलांतरित झालेल्या परदेशी पाहुण्याचे थवे सध्या तळकोकणातील सागरी महामार्गालगत असलेल्या पाणथळ भागात पहायला मिळतात. वेंगुर्ले तालुक्यातील न्हयचीआडमध्ये पाणथळ आणि दलदलीच्या भागात बगळ्यांसोबत मोर शराटी हे परदेशी पाहुणे पहायला मिळतात. प्रत्यक्षात मोरांप्रमाणे दिसत असल्याने या पक्षांना मोर शराटी म्हटलं जात. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून हिवाळ्यात हा पक्षी सिंधुदुर्गात येतो. जिल्ह्यातील पाणथळ  भागात वास्तव करून इतर पक्षांची घरटी वापरून त्याठिकाणी राहतात. सागरी महामार्गावरून येणारे पर्यटक आवर्जून याठिकाणी थांबून या परदेशी पक्षांचे निरीक्षण करतात. 


युरोप मधून स्थलांतरित झालेला मोर शराटी हा पक्षी तळकोकणातील पाणथळ भागात किंवा दलदलीच्या भागात वास्तव्य करत आहे. साधारपणे 60 सें. मी. आकाराचा मोर शराटी पक्षी लांबून पाहिला तर काळा दिसतो मात्र प्रत्यक्षाता काळ्यासह हिरवट-तांबूस रंगाचा हा पक्षी असतो. वीण काळातील नराचे रंग जास्त चमकदार असतात. एरवी नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी थव्याने राहतात. मोर शराटी हा भारताच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, ओडिशा, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात प्रामुख्याने तसेच नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या आशियाई देशात हिवाळी पाहुणे म्हणून युरोपमधून स्थलांतर करून येतात. हा पक्षी बगळ्यांसह राहतो.
 
उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव हे मोर शराटी पक्ष्याचे खाद्य आहे. साधारणपणे नोव्हेंबर ते मे हा काळ या पक्ष्यांचा वीण काळ आहे. यांचे घरटे पाण्यात उभ्या असलेल्या किंवा उंच झाडांवर, मोठ्या काटक्या वापरून केलेले असते. अशाच झाडांवर बहुधा बगळ्यांचे घरटेही असते. मोर शराटी पक्ष्याची मादी एकावेळी 2 ते 4 हिरवट निळ्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनाची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
 
डोक्यावर पिसे नसतात तर लाल रंगाचा आखुड तुरा किंवा लाल रंगाचे खडबडीत आवरण असते. डोके काळे, खांदा पांढरट, डोळे लाल असतात. मानेवर लोकरीसारखी पिसे असतात. दुरुन हा शराटी काळा दिसतो पण जवळून पाहिले असता याच्या पंखांमध्ये निळ्या रंगांची पिसे असतात. चोच कुदळीसारखी लांब व बाकदार तर पाय लांब व मजबुत असतात. काळा शराटीचे नर व मादी दोघेही दिसायला सारखेच असतात. मोर शराटी तलाव, दलदली या भागात रहाणे पसंत करतो. मोर शराटी थव्याने वावरतो. दिवसभर थव्याने फिरणारे हे पक्षी उंच झाडाच्या शेंड्यावर एकत्र जमा होतात. इतर पक्षांनी सोडून दिलेले आयते घरटे वापरतो. याचे घरटे झाडावर इतर पक्ष्यांसोबत असते.