अहमदनगर : कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी कोणत्याही जातीचा असला, तरी त्याच्यावर कारवाई होणारच, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

 

नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर



कर्जत बलात्कार प्रकरणाच्या तपासात जातीचा अडथळा येत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आरोपीची जात पाहिली जात नाही, त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करणारच, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं

 

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या अंगावर अंडीफेक



दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्जतमधील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा



आरोपींना सत्र न्यायालयात हजर करताना संतापलेल्या नागरिकांनी न्यायालयाच्या आवारात या आरोपींवर अंडी फेकली. दुसरीकडे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यात आज बंद पुकारण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या

कोपर्डी प्रकरण: राम शिंदेंसोबत फोटोत असलेली ‘ती’ व्यक्ती आरोपी नाही


आरोप करणाऱ्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी मागावी: मुख्यमंत्री


राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी


मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई