पुणे : कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील काल (रविवार) भांडारकर रोडवर डॉ. अभ्यंकर यांच्या कारच्या धडकेत दुचाकीवरुन जाणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.


 

 

अरुंधती हसबनीस असं मृत महिलेचं नाव असून तिला अडीच वर्षांचा मुलगा आहे. मृत महिला पंजाब नॅशनल बँकेत नोकरीला होती.

 

पुण्यात ‘कॉसमॉस’च्या अध्यक्षांच्या गाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू


 

अरुंधती दुचाकीवरुन लॉ कॉलेज रोडवरुन गूडलक चौकाच्या दिशेने जात होती. मात्र त्याचवेळी मुकुंद अभ्यंकर यांच्या कारने अरुंधतीला मागून धडक दिली आणि यातच तिचा मृत्यू झाला. मुकुंद अभ्यंकर स्वत: कार चालवत होते. तसंच अपघातानंतर मुकुंद अभ्यंकर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

 

 

या अपघातानंतर मुकुंद अभ्यंकर यांच्याविरोधात प्रभात पोलिस स्टेशनमध्ये कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानतंर रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास मुकुंद अभ्यंकर यांना अटक करण्यात आली. अभ्यंकरांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.