कोणती काळजी घ्याल?
- शक्य असल्यास कोरडे कपडे घालावेत
- मधुमेहाच्या रुग्णांनी या पाण्यात उतरणं टाळावं
- विनाकारण पुराच्या पाण्यात जाऊ नका
- वीजेच्या तारांना स्पर्श करु नका
- पाणी 15 ते 20 मिनिटं उकळवून प्या
- मलेरिया, डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये म्हणून पाणी साचू देऊ नका
- शिजवलेलं ताजं अन्न खा
- भिंतीवर निर्माण झालेलं शेवाळं खरवडून काढून टाका
रोगराईच्या या संकटापासून स्वतःचा बचाव करणं हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे काळजी घ्या हेच पूरग्रस्त नागरिकांना एबीपी माझाचं आवाहन आहे.