मुंबई: जातव्यवस्थेबद्दल सरसंघचालक मोहन भागवतांनी (RSS Chief Mohan Bhagwat News) एक वक्तव्य केलं आणि संपूर्ण देशभरात गदारोळ उडाला. पण मुळात या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. पंडित या शब्दाचा अर्थ विद्वान असून तो कुठल्याही विशिष्ट जातीसाठी सरसंघचालकांनी वापरला नव्हता असं सांगितलं जातंय. रविवारी मुंबईतल्या संत रोहिदास जयंती (Sant Rohidas Jayanti) कार्यक्रमात सरसंघचालकांनी हे वक्तव्य केलं होतं. मोहन भागवतांच्या या मराठी वाक्याचा हिंदी अनुवाद विशिष्ट जातीवरच प्रहार होतोय असा बनला. त्यातून मग वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियाही येऊ लागल्या. संघ सर्वसमावेशक बनताना ब्राम्हणी व्यवस्थेच्या चुका मान्य करतोय का अशाही चर्चा सुरु झाल्या. 


गेल्या काही दिवसातल्या सरसंघचालकांच्या भूमिका पाहिल्या तर त्यात सर्वसमावेशकतेची आस


पण या वादाची मालिका वाढत असतानाच संघाचे नेते सुनील आंबेकर यांनीही याबाबत तातडीचं स्पष्टीकरण दिलं. सोबतच चुकीच्या अनुवादामुळे आधीचं ट्वीट हटवत असल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं जाहीर केलं. सरसंघचालक जातीव्यवस्था चुकीची आहे असं म्हणतायत. उच्च-नीच हा भेदभाव हा चुकीचा आहे असं म्हणतायत. फक्त त्यांच्या वक्तव्यातून या व्यवस्था निर्माण करण्याला ब्राम्हणच जबाबदार आहेत असा जो अर्थ गेला तो चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण संघाकडून आलं आहे. थोडक्यात मराठीतला पंडित आणि हिंदीतला पंडित या शब्दांचे अर्थ वेगळे असल्यानं हे झाल्याचं म्हटलं जातंय. 


गेल्या काही दिवसातल्या सरसंघचालकांच्या भूमिका पाहिल्या तर सर्वसमावेशकतेची आस त्यांना लागल्याचं दिसतं. त्यामुळे आता सरसंघचालकांच्या या वक्तव्यातून संघाचा प्रवास एका नव्या दिशेनं सुरु झाला आहे का याची उत्सुकता आहे. 


संघ सर्वसमावेशक होत चाललाय का?


- जात व्यवस्थेबद्दल सरसंघचालक याआधीही बोलत आलेत. ही व्यवस्था हिंदू समाजात दुहीचं काम निर्माण करतेय असं त्यांनी म्हटलं. 
- याआधी मुस्लीम समुदायाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत संघानं सर्वसमावेशकतेचं पाऊल उचललं होतं.
- महिलांना समान संधी, समान दर्जा मिळाला पाहिजे असंही सरसंघचालकांनी म्हटलं. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुण्या म्हणून महिला गिर्यारोहक संतोष यादव यांना बोलावण्यात आलं होतं. 
- नुकतंच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही पंतप्रधान मोदींनीही मतांची अपेक्षा न करता अल्पसंख्याकांपर्यंत पोहचण्याचं आवाहन केलं होतं. 


ही बातमी वाचा;