मुंबई : हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेच्या तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. पीडीता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल. त्यासाठी अॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

 

हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली पण काळाने घाला घातला. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल व खटला जलदगतीने चालविण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Hinganghat Women Ablaze | आरोपीला फाशीची शिक्षाच व्हावी : सुप्रीया सुळे | ABP Majha


हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज संपली आहे. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला आहे. तीन फेब्रुवारीला विकेश नगराळे या नराधमानं पीडितेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेच्या मृत्यूची माहिती कळताच हिंगणघाट शहरात वर्ध्यातील काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद कऱण्याचं आवाहन केलं आहे. काही प्रमाणात दुकानं बंदही करण्यात आलीय. दरम्यान, हिंगणघाट शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ज्या महाविद्यालयात हिंगणघाटची पीडिता शिकवायची, त्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पीडितेला श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाविद्यालयातील संपूर्ण वातावरण शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या :

Hinganghat Women Ablaze | आरोपीलाही पीडितेप्रमाणेच यातना व्हायला हव्या, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया

BLOG : 'ती' सुटली, आपल्यातल्या आगीचं काय?