मुंबई: जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनौमध्ये हजेरी लावली.


लखनौमध्ये लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'स्वस्थ मनानं जगण्याची कला ही फक्त योगमधून मिळते. आज संपूर्ण जगात योग दिवस उत्साहात साजरा करत आहेत.'

'ज्या पद्धतीनं जेवण्याच मीठाचं महत्त्व असतं तेवढंच महत्त्व आपल्या जीवनात योगाचं आहे. सुखी राहण्यासाठी योगचं महत्त्व मोठं आहे.' असंही यावेळी मोदी म्हणाले.

दुसरीकडे अहमदाबादमध्ये खुद्द योगगुरु रामदेव बाबांसोबत भाजपाध्यक्ष अमित शहांनी योगासनं केली. तर नागपूरमध्ये केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावली.

तर योगा डे निमित्ताने आज संयुक्त राष्ट्र मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. योग या शब्दाच्या आकारात ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सुद्धा योगा डे निमित्ताने युनोच्या मुख्यालयाला रोषणाई करण्यात आली होती.