येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो त्याचं पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्तावाचा असणार आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची शिवसेनेच्यावतीने जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्राभर ‘जन आशिर्वाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आदित्य संवाद’नंतर शिवसेनेचं दुसरं महत्वाचं पाऊल आहे. Aditya Thackeray | दिशा पाटनीच्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार, आदित्य ठाकरेंनी जोडले हात | ABP Majha “ज्यांनी मत दिले आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत, तर ज्यांनी नाही दिली, त्याची मनं जिंकायची आहे” या मथळ्याखाली या जन आशिर्वाद यात्रेचं आयोजन करण्यासत आलं आहे. शुक्रवारपासून आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असून घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो त्याचं पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्तावाचा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीच महाराष्ट्रात विकास यात्रा जाहिर केली आहे. ऑगस्ट महिन्यात फडणवीस ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ ही विकास यात्रा काढणार आहेत. भाजप आणि शिवसेना दोघेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असल्याने या दोन्ही यात्रांना राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. संबंधित बातम्या