बुलडाणा : बुलडाण्यातील खामगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आषाढी एकादशीच्या वारीसाठी बस सोडण्यास उशीर झाल्याने खामगाव आगार व्यवस्थापकांना मारहाण केली आहे. ही मारहाणा भाजप आमदार आकाश फुंडकरांच्या उपस्थितीत झाली आहे.

VIDEO | बुलडाण्यातील खामगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी | ABP Majha



आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारीसाठी गाड्या सोडण्यास खामगावच्या आगारातून उशीर झाला. त्याचा जाब विचारण्यासाठी भाजप आमदार फुंडकर खामगावच्या आगारात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते. भाजपचे आमदार कार्यकर्ते खामगावच्या आगारात पोहोचताच व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांना जाब विचारत मारहाण केली.

दरम्यान आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांच्या मनमानीला कंटाळून काल एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याची माहिती मिळत आहे.