औरंगाबाद : शाळेला शिक्षक मिळावा या मागणीसाठी औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील कसबा गावातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. आणि शाळेला शिक्षक मिळावा म्हणून जिल्हा परिषदेसच्या कार्यालयात आंदोलन करत घोषणाबाजी केली.


खुलताबाद तालुक्यातील कसबा गावात जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील या विद्यार्थिनी आहेत. या शाळेतील आठवीच्या वर्गात 45 तर नववीच्या वर्गात 52 विद्यार्थी आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून उर्दूच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

Rural News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | ABP Majha



शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांनी एक निवेदन दिले होते. परंतु, त्यावर प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यापूर्वीच आठवीला आणि त्यानंतर नववीला शिक्षक देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता दहावीव्या वर्गातसुद्धा ते प्रआशसनाचे आश्वासन हवेतच राहिले. त्यामुळे या शाळेत गरीबांच्या मुला-मुलींनी शिकायचे की नाही असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे.