Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणी सातत्यानं होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आदित्य ठाकरे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं समजतेय. (Aditya Thackeray to take legal recourse in Disha Salian case?)


दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कोर्टात जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. बदनामी करणाऱ्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना या प्रकरणावरुन वारंवार टार्गेट केलं जात आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांना भाजप (BJP) नेत्यांकडून जबाबदार धरले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी याआधी यावर कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता ते आरोप करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसतेय. ते आता याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं समोर आलं आहे.  


दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने फोन येत होते आणि एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा असल्याचा आरोप केला होता. शेवाळे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून सत्ताधाऱ्यांविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून ते दिसा सालियान प्रकरणात त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहेत. 


"एका 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती. नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी लक्ष करण्यात आलं होतं. त्यांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी  सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.  दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमधील AU नावावरुन हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दिशा सालियान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेही आता आक्रमक झाले असून कायदेशीर सल्ला घेत आहेत. 


महत्वाच्या बातम्या


आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप